Wednesday, April 18, 2007
This site is moved to
http://kavyadhara.wordpress.com
Please click on above link.
Sorry for inconvinience.
Poems don't look like the poems on the blogspot.so moved to wordpress, kindly have a fresh look at
Monday, March 05, 2007
Thursday, December 21, 2006
आक्रंदन,
आक्रंदन,
भावनांचे,
मनातील माझ्या
तिला कधी जाणवतच नाही.
भेट्लो होतो
कधीतरी
समोरासमोर,
तिला कधी आठवतच नाही.
गरज नाही तिला
स्वतःला हे मी
समजावुन थकलो
पण मन हे तिला विसरतच नाही.
प्रमोद कमलनाथ
Monday, November 27, 2006
साईन
टीचभर पोरगं
हाणते औत
तेव्हा बापाचं
पिळवटून जाते मन
पण थकलेल्या देहाला
लागते विसाव्याची तहान.
कानाडोळा करत
बाप घेतो विसावा
नेमके तिथेच होते
साईन
जिंदगीचे मरणाच्या ऍग्रीमेंटवर!
- हेमंतकुमार एकनाथ कांबळे
(स्वप्न हरविलेल्या रानात)
Sunday, November 26, 2006
का ?
तुझ्या खूप कोरड्या वागण्यातच
मी वाहून जाते,
तुला मात्र डुबायला
पूरच का लागतो?
-मनिषा साधू ( मावळत का नाहीस?)
Wednesday, November 22, 2006
काय झाले?
आसवांचे,यातनांचे,पाखरांचे काय झाले?
पेटलेल्या पिंजऱ्यांचे, वादलांचे काय झाले?
वाळवंटाचा प्रवासी केवढा हैराण झाला!
चालताना हे अचानक मृगजळांचे काय झाले?
नेमके ते काय होते जे तुझ्या ओठी न आले
जन्म ज्यांचा अंत होता,त्या कथांचे काय झाले?
शेवटी ते युद्ध होते... शेवटी युद्धात सांगा
कौरवांचे काय झाले? पांडवांचे काय झाले?
पत्थरांच्या कोणत्या शहरातला मी राहणारा,
माझिया पदरातल्या फुलपाखरांचे काय झाले?
-अमोल ज्ञानेश्वर
विद्यर्थी वसतीगृह,बा.आं.महाविद्यालय औरंगाबाद.
तू आई झाल्यामुळे!
एका अनामिक धुंदीत...
पुन्हा वलू लागतात
माझी पाऊले
तुझ्या
मंत्रमुग्ध पारिजातकी
आकर्षणाकडे...
म्हणूनच
मला निर्विवाद
सामाऊन घेणारा तुझा
निळा... हिरवा... समुद्र
पुन्हा चंद्रशीतल ठेव.
कारण तुझ्या
मखमली पाऊलखुणांवर
माझे हळवे प्रेमांकुर
अधिक दुप्पट बहरात येतायत.
तू आई झाल्यामुळे!
-दिनेश सातव,नांदुरा जि.बुलडाणा
Sunday, October 08, 2006
शोधतोय संत
त्याचा देह गेला
पंचनाम्यासाठी
सोडुनिया गाठी
संसाराच्या...
मातीमुळे झाली
आयुष्याची माती
विझल्यात वती
पणतीच्या...
पेरावं वावर
धरावं रुमणं
सांगावं गऱ्हाण्म
मातीलाच...
कधी पावसानं
कधी दलालानं
दिलं नाही पाणी
घोटभर....
चांदण्या रात्री
दारात काळोख
झाली ना ओळख
चांदण्याची...
त्याच्या मरणाची
आहे कुणा खंत
शोधतोय संत
त्याच्यासाठी.......
गणेश भाकरे,बोरगांव रेमण्ड,जि. छिंदवाडा.
Subscribe to:
Posts (Atom)